ज्योतिर्लिंगे
भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा :
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले
मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां
भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं
त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं
प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
हिंदु धर्मानुसार अस म्हणल जात
की जी व्यक्ति "वरील बारा ज्योर्तिलिंगाचे नावानुरुप मंत्र" जर दररोज
पहाटे व सायंकाळी जपन केला तर सात जन्मातील झालेला पाप ज्योर्तिलिंगाच्या स्मरणामुळे
/ जप केल्यामुळे सर्व पापांचा विनाश होतो.
- सोमनाथ (गुजरात - वेरावळ)
- मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)
- महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)
- ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)
- वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)
- भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)
- रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)
- नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ)
- विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)
- त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)
- केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)
- घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद)
भीमाशंकर

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी
उगम पावते, अशी श्रद्धा आहे..

भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर (इतिहास)
दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे..
ती शिवालये अशी : गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे - बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे - टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी - रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या - हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ - खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या - पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या - पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी - वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे.डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे.
नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. | दुवा= प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया | ॲक्सेसदिनांक=४ जुलै, इ.स. २०१३} मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.
"गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ॥ १० ॥
ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.
येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ(?) आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.
भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात .
गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.
त्र्यंबकेश्वराजवळील पाहाणे या आदिवासी गावातील एक घर या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः तांदूळ व नाचणी ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.
घृष्णेश्वर
घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.
मंदिराचे बांधकाम
वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.
राष्ट्रीय संरक्षित स्मारक
या मंदिराला २७ सप्टेंबर, इ.स. १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
वैजनाथ
परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते.
परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.
औंढा नागनाथ
औंढा नागनाथ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली
जिल्ह्यातील एक गाव व तालुका आहे. आमर्दकपूर (औंढा-नागनाथ, जि. हिंगोली, ) हे ज्योतिर्लिंग क्षेत्र
आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही
अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. 'आमर्दक सन्तान' या नावाने ओळखल्या
जाणार्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या
ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता.
भारतातील पवित्र बारा
ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणार्या नागनाथ (नागेश्वर)
मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे
मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे.
परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे.
तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख
केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची
९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे
संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच आहे.
अंजनवाडा अंजनवाडी अनखळी असोंदा
असोला असोला आजरसोंडा आमदरी उंडेगाव उखळी उमरा औंढा नागनाथ कंजारा काकडदाभा काठोडा
तांडा कुंडकर पिंपरी केळी कोंडशी बुद्रूक गढाळा गांगलवाडी गोजेगाव गोळेगाव चिंचोली
चिमेगाव चोंडी शहापूर जडगाव जलालदाभा जलालपूर जवळा जामगव्हाण जोडपिंपरी टाकळगाव
ढेगज तपोवन दुघाळा तामटी तांडा दरेगाव दुरचुना देवाळा देवाळा दौडगाव धार नांदखेडा
नांदगाव नागझरी नागेशवाडी नालेगाव निशाणा पांगरा पार्डी सावळी पिंपळदरी पिंपळा
पुरजळ पूर पोटा पोटा खुर्द फुलदाभा बेरुळा बोरजा ब्राह्मणवाडा भोसी माथा मार्डी
मूर्तीजापूर सावंगी मेथा येडूत येळी येहळेगाव रांजाळा राजदरी राजापूर रामेश्वर
[रामेश्वर १] रूपूर लक्ष्मणनाईक तांडा लांडाळा लाख लोहरा खुर्द लोहरा बुद्रूक
वगरवाडी वगरवाडी तांडा वडचुना वडद वसई वाळकी शिरड शहापूर शिरला संमगानाईक तांडा
सारंगवाडी साळणा सावरखेडा सावळी खूर्द सावळी बुद्रूक सिद्धेश्वर सुकापूर सुरेगाव
सूरवाडी सेंदूरसना सोनवाडी हिवरखेडा हिवराजाटू ........ई.
Courtecy:Wikipedia

Comments
Post a Comment